मुंबई: अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे (State Announces more Financial Help for Farmers). अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत हेक्टरr दुपटीने वाढ करण्यात आली आहे. जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार असल्याचे महसुल विभागाने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता 36 हजार रुपये मिळणार आहेत असून नुकसानीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे महसूल विभागाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पिके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 22232.45 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, नुकसान भरपाईत हेक्टरी दुप्पटीने वाढ
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा