नागपूर : काँग्रेस नेते व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज पहाटे मॉर्निंग वॉक करण्याकरिता गेले असता पाय घसरून पडले. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. हातात प्रचंड वेदना असलेल्या अवस्थेत त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे हलविण्यात आले. तिथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला रेफर करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी त्यांना अधिवेशनासाठी तैनात तपासणी अधिकाऱ्यांनी तपासले होते. त्यांना विमानतळावर हलविण्यात आले असून पूढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे, यशोमाती ठाकूर रुग्णालयात थोरात यांच्या भेटीकरता गेले होते.