अन्यायग्रस्त तरुणांच्या पाठीशी काँग्रेस-विनीत पुनिया

0

 

नागपूर-पूर्वीच्या सैन्य भरती प्रक्रियेतील युवकांना पुन्हा भरतीत समाविष्ट करण्यात यावे, व सध्यस्थितीत अग्निवीर भरती झालेल्या युवकांना केंद्र सरकारमार्फत त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पूर्वीच्या स्कीममध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते विनीत पुनिया यांनी पत्रपरिषदेत केली. आज देशभरातील 20 शहरात अन्यायाविरुद्ध न्यायाचे युद्ध असलेल्या जय जवान या अभियानअंतर्गत राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली जात आहे.
अग्निविरमधील दीड लाख युवकांना आवाहन करताना पुनिया म्हणाले, ज्या तरुणांचे अगोदर सिलेक्शन झालं मात्र त्यांना नोकरी न दिल्याने त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मोठी तयारी करून देश सेवा करायची त्यांची इच्छा होती. त्यांचा हक्क,अधिकार बळकावण्यात आला. त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे.
युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 50 किलोमीटर आमचे नेते न्याय योद्धांसोबत चालतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारत जोडो यात्रेला देशातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मनिपुरमधून सुरु झालेली भारत न्याय यात्रा, मुंबई येथे समाप्त होणार आहे.
रोज नवीन ऊर्जा आणि लोक यामध्ये समाविष्ट होत आहेत आणि यात्रेमुळे नक्कीच मोठे बदल देशात पाहायला मिळेल. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आपले अपयश झाकण्यासाठी लोकांचे लक्ष विचलित करण्याचं काम करत आहे. लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून त्यांच्यात दुरावा निर्माण करणे ही मानसिकता भारतीय जनता पार्टीची आहे असा आरोपही पुनिया यांनी केला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ विकास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.