उपराजधानीत नव्या लाटेतील पहिला बळी : प्रादेशिक मनोरुग्णालयात आढळने 7 बाधित
नागपूर. संपूर्ण देशातच कोरोनाचा विळखा घट्ट (Corona is getting stronger in the country) होतो आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) झपाट्याने रुग्णवाढ होते आहे. उपराजधानी नागपुरातही (Magpur) दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा वाढतो आहे. उपराजधानीत करोना वाढत असून शुक्रवारी या आजाराचे आणखी 84 रुग्ण आढळून आले आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयात देखील सात रुग्ण पाझिटिव्ह आढळून आल्याने चिंता वाढली आहे. या रुग्णालयातील बाधितांची एकूण संख्या 10 झाली आहे. एम्समध्ये एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. नव्या लाटेतील हा पहिला मृत्यू ठरला आहे. लसीकरणामुळे आटोक्यात आलेली कोरोना संक्रमण साखळी पुन्हा वाढत असल्याने नागपूरकरांच्या चिंतेत भर पडत आहे. त्यात हवामानातल्या सततच्या चढउतारामुळे रोग राईला पोषक वातावरण तयार झाले आहे. संक्रमण साखळी शतकाच्या उंबरठ्यावर जाऊन बसल्याने विळखा वाढत असल्याची भिती वाढत आहे.
एम्समध्ये दगावलेला 65 वर्षीय रुग्ण हा मूळ मध्य प्रदेशातील आहे. त्याला कॅन्सरही होता. करोनाची लक्षणे असल्याने त्याला एम्सला दाखल केले होते.
साडे सात महिन्यानंतर रुग्णसंख्या 80 वर
जिल्ह्यात गतीने बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. यंदाच्या या लोटेतील ही रुग्णसंख्येतील उच्चांकी ठरली आहे. तर जिल्ह्यात 13 ऑगस्ट 2022 नंतर प्रथमच रुग्णसंख्येने 80 चा टप्पा ओलांडला आहे.
सक्रिय रुग्णांमध्ये युवक अधिक
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निरीक्षणानुसार, शहरातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये शून्य ते 20 वयोगटातील 8 टक्के, 21 ते 40 वयोगटातील 41 टक्के, 41 ते 60 वयोगटातील 28 टक्के, 61 हून अधिक वयोगटातील 23 टक्के रुग्णांचा समावेश आहे.
एक्सबीबी 1.16 चे 15 रुग्ण
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ‘एक्सबीबी. 1.16 चे’ शहरात आणखी 15 रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. हा कोरोनाच्या ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. गुरुवार या व्हेरियंटने सकारात्मक अहवाल आढळून आलेल्या पंधरा रुग्णांपैकी 3 जण ठणठणीत असून, 12 जण उपचार घेत आहेत.