Home MAHARASHTRA पुण्यातील तरुणांचा जीवघेणा फाजीलपणा

पुण्यातील तरुणांचा जीवघेणा फाजीलपणा

0

पुणे(Pune) ३ जुलै :- अँब्युलन्सला लटकून दिवे घाटातून प्रवास, व्हिडीओ व्हायरल
तरुणांचा जीवघेणा प्रवास कॅमेऱ्यात चित्रित झालाय. दिवेघाटातून येताना तरुण अँब्युलन्सला लटकून प्रवास करत असल्याचं दिसत आहेत. नागरिकांनी संबंधित प्रकार मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आहे. अशा पद्धतीचा प्रवास जीवावर बेतू शकतं तरीही नसतं धाडस करुन जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यामुळे अशा मुलांचं काय करायचं असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पुण्यातील मुक्काम आटोपून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी दिवे घाट सर करून सासवडला मुक्कामी पोहचला. हरिनामाच्या आणि विठू माऊलीच्या जय घोषाणेने दिवे घाट दुमदुमला होता. अवघड असणारा हा दिवेघाट लाखो वैष्णवानी लिलया पार केलाय. दिवेघाटातील पालखीचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. माऊलींच्या पालखीसाठी अवघा दिवे घाट फुलला होता. पालखी सासवडला गेल्यानंतर दिवे घाटात प्रचंड गर्दी झाले. पुण्याकडे मिळेल त्या वाहनाने नागरिक घरी परतत होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आह. घाटातून प्रवास करताना चार तरुण चक्क रुग्णवाहिकेच्या मागच्या बाजूला लटकत असल्याचं पाहायला मिळालं. ॲम्बुलन्सला मागे पकडून चौघाजणांनी जीवघेणा प्रवास केल्याचं समोर आलं आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.