Devendra Fadnavis “फडणवीस त्यावेळी शाळेत असतील, त्यांना इतिहास माहिती नसेल…” पवारांचे प्रत्युत्तर

0

मुंबई- Mumbai  “१९७७ मध्ये शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदेंनी केले तर ती गद्दारी का?” असा बोचरा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करताना केला (Sharad Pawar Reply to Devendra Fadnavis) होता. त्याला पवारांनी सोमवारी उत्तर दिले. “मी 1977 ला राज्यात वसंतदादांचे सरकार बदलले त्याला भाजपचा म्हणजेच तेव्हाच्या जनसंघाचा पाठिंबा होता. मी सर्वांना सोबत घेऊन सरकार बनवले होते. सरकारमध्ये जनसंघाच्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिले होते. Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस तेव्हा कदाचित प्राथमिक शाळेत असतील म्हणून त्यांना हा इतिहास माहिती नसेल..” असा टोला पवारांनी फडणवीस यांना लगावला. त्यामुळे आता फडणवीस त्यावर काय प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलेले आहे.

फडणवीसांची पवार, ठाकरेवर तोप

फडणवीस म्हणाले की, 1978 मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी, हा कुठला न्याय? फडणवीस यांच्या टीकेला पवारांनी उत्तर दिले. शरद पवार म्हणाले, मी गद्दारी कशी केली, हे फडणवीसांनी सांगावे. 1977ला आम्ही राज्यातील सरकार बदलले होते. त्याला भाजपनेही पाठिंबा दिला होता. फडणवीस त्यावेळी लहान होते. त्यामुळे त्यांना याची माहिती नसेल, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींना केवळ दाखविण्यापुरते घेतले जाते, या फडणवीस यांच्या टीकेवर शरद पवारांनी उत्तर दिले. “हेही फडणवीसांचं अज्ञानच आहे. राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यानंतर पिचड होते. सुनील तटकरे होते. हे सगळे कोण आहेत?”, असेही पवार यावेळी म्हणाले.