पटोले आणि वडेट्टीवार यांना ओबीसींवर बोलण्याचा अधिकार आहे का?

0

नागपूर- संपूर्ण महाराष्ट्रात राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरु आहे.
इटालियन परिवारात जन्म घेतलेल्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा ओबीसांचा अपमान केला आहे. राहुल गांधी वारंवार ओबीसी आणि नरेंद्र मोदी यांचा अपमान करतात.
कॉंग्रेसने कधीच ओबीसांचा सन्मान केला नाही, आरक्षण दिलं नाही. आता लोकच त्यांना धडा शिकवतील. यामुळे आता मला नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचा राजीनामा मागायचा असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.ओबीसी नेते स्वत: ला म्हणतात आणि त्यांचा नेता हा ओबीसांचा अपमान करतो, नाना पटोले व विजय वडेट्टीवार हे लोक ओबीसीच्या गोष्टी करतात. ओबीसी समाज कधीचं हा अपमान सहन करणार नाही. आम्ही यांना सोडणार नाही. मुळात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना ओबीसींवर भाषणं करण्याचा अधिकार आहे का ? कॉंग्रेसने ओबीसींसाठी काही केले नाही. नरेंद्र मोदी ओबीसींसाठी काम करत आहेत.
असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.