
नागपूर – बजरंग दलाने नागपूर दीक्षाभूमी ते अयोध्या अशा बाईक यात्रेचे आयोजन केले आहे. पण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अणि वंचित बहुजन आघाडीने याचा तीव्र विरोध केला आहे. “बौद्ध धम्म विज्ञानवादी आणि देवाला न मानणारा धम्म आहे. त्यामुळे विचाराची भिन्नता असताना दीक्षाभूमीवरुन बजरंग दलाच्या अयोध्या बाईक यात्रेचा विरोध करतोय” असं वंचित बहुजन आघाडीचे नेते राहूल वानखेडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे दीक्षाभूमी येथून सुरू होणारी विश्व हिंदू परिषद बजरंगदलाची बाईक रॅलीच्या प्रारंभस्थळ बदलून दिले. आता अण्णाभाऊ साठे चौकातून बाईक यात्रा सुरू होईल. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकऱ्यांनी बाईक यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी जय भीम, जय श्रीराम, जय शिवाजी असे नारे दिले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















