मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद आता बनेल पितळ ,फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात

0

 

भाविकांच्या आरोग्याची काळजी : महाप्रसादातील सर्व पदार्थ बनतात गावरान तूप व शेंगदाणा तेलात

अमळनेर :
येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात मिळणाºया महाप्रसादातील सर्व खाद्य पदार्थ कल्हई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनविणे येत्या गणेश जयंतीपासून अर्थात १३ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे .भाविकांच्या आरोग्याच्या काळजीतून मंदिराचे सुव्यवस्थापन करणाऱ्या मंगळ ग्रह सेवा संस्थेने हा निर्णय घेतला आहे . महाप्रसादातील सर्व पदार्थ फक्त गावरान तूप व शेंगदाणा तेलात बनविले जातात , हे विशेष .
मंदिरात भारताच्याच नव्हे तर जगाच्याही कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात. त्यांना भरपेट व आरोग्यदायी अन्न मिळावे म्हणून त्यांची काळजी घेत याठिकाणी अल्पदरात पौष्टीक व दर्जेदार महाप्रसाद दिला जातो. महाप्रसादात खान्देशी मेनू अर्थात पंचरत्न दाळ, भात, बट्टी, मटकीची भाजी आणि जिलेबी असे चविष्ट पदार्थ असतात. अ‍ॅल्यूमिनियमच्या भांड्यांचा वापर आरोग्यासाठी घातक असल्या कारणास्तव संस्थेने हे सर्व खाद्य पदार्थ कल्हई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनविण्याचा निर्णय घेतला आहे. ही भांडी गुजराथ येथून थेट उत्पादका कडून घेतली आहेत.
८ रोजी मंदिरात केशव पुराणिक , सारंग पाठक, जयेंद्र वैद्य, अक्षय जोशी , मेहुल जोशी व गणेश जोशी यांनी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहीरम, विश्वस्थ अनिल अहिरराव व डी.ए.सोनवणे यांच्या हस्ते या भांड्यांची विधीवत पूजा करउन घेतली.

इंग्रजांनी आणली होती अल्युमिनियमची भांडी

इंग्रजांच्या जाचक राजवटीत स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगात ठेवले जात होते . त्या काळात भारतात सर्वत्र तांबे, पितळ व काश्याचे भांडे वापरले जात होते . अल्युमिनियम आरोग्यासाठी घातक आहे हे इंग्रजांना माहित होते . त्यामुळेच त्यांनी तत्कालीन वापरात असलेल्या तांबे,पितळ व काश्याची भांडी कैद्यांसाठी दिली नाहीत. कैद्यांना विविध आजार होऊन ते लवकर मरावेत यासाठी त्यांनी भारतात सर्वप्रथम अल्युमिनियमच्या भांड्यांचा कैद्यांसाठी वापर सुरु केला .

फक्त फुडग्रेड स्टीलच असते वापरायोग्य

हल्ली जवळपास सर्वच हॉटेल्स व केटरर्स अल्युमीनियमच्या तसेच स्टील व प्लॅस्टिकच्या भांड्याचाही वापर करतात. अल्युमिनियम तर घातक आहेच मात्र स्टील व प्लॅस्टिकची भांडी जर फुडग्रेड म्हणजेच खाद्यपदार्थ बनविणे व वाढणे यासाठी योग्य नसतील तर तीही आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात .

समाजाभिमुखता आणि लोककल्याण हेच ब्रीद

समाजाभिमुखता व लोककल्याण हेच मंगळ ग्रह सेवा संस्थेचे ब्रीद आहे.त्यातूनच आम्ही हा खर्चिक मात्र भाविकांसाठी आरोग्यदायी निर्णय घेतला आहे. अल्युमिनियम सह फुडग्रेड नसलेल्या सर्वच प्रकारच्या भांड्यांचा वापर सक्तीने बंद होणे काळाची गरज आहे. शासनाकडेही आम्ही त्यावर बंदीची मागणी केली आहे.

डिगंबर महाले
अध्यक्ष
मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर