मोदींचा, ओबीसींचा अपमान भाजप खपवून घेणार नाही,दिला इशारा

0

 

नागपूर NAGPUR  – काँग्रेसनेते राहुल गांधीच्या Congress leader Rahul Gandhi मनात ओबीसींबद्दल कायम असलेली घृणा ही वेळोवेळी ते मांडत असतात. यातूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा ओबीसी समाज असेल यांच्या विरुद्ध नेहमीच बोलतात, नेहरू गांधी कुटुंब नेहमीच OBC  ओबीसी विरोधी राहिले आहे महाराष्ट्रात मोदींचा किंवा ओबीसींचा अपमान भाजप खपवून घेणार नाही असा इशारा आज भाजप नेत्यांनी राहुल गांधी विरोधातील आंदोलनातून दिला. राज्यभरात भाजपने याच प्रकारे निषेध आंदोलन केले.

या आंदोलनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी मोर्चा प्रभारी डॉ आशिष देशमुख, भाजप नेते जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आ कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, रवींद्र चव्हाण, चंदन गोस्वामी आदी अनेक नेते,पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.