
संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची टीका
मुंबई, 9 फेब्रुवारी – मागील आठवड्यात कल्याण आणि मुंबईत राजकीय नेत्यांवर नेत्यांकडून गोळीबार होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा विरोधकांनी मागितला असून मुख्यमंत्री EKNATH SHINDE एकनाथ शिंदे गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप केला जात आहे.
पुणे आणि मुंबईत होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना यामुळे विरोधकांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. गृहमंत्री फडणवीस अपयशी ठरल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले “अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो.”