(New Dillhi)नवी दिल्ली– महाराष्ट्रासह काही राज्यांवर यंदा दुष्काळाची टांगती तलवार असल्याची भीती हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 9 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये (In Union Territory) यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत असून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी व उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने पाच मंत्रालयांचा एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. दुष्काळ पडल्यास काय उपाययोजना करता येतील, याची चाचपणी या टास्कफोर्सच्या माध्यमातून केंद्र सरकारने सुरु केली आहे.
भारतीय हवामान विभागाने यंदा सामन्य पावसाचा अंदाज वर्तविला असाल तरी प्रत्यक्षात काही राज्यांवर दुष्काळाची टांगती तलवार असल्याची हवामान खात्याची अंतर्गत माहिती आहे. यात (Maharashtra)महाराष्ट्र, (Goa)गोवा, (Karnataka)कर्नाटक, (Andhra Pradesh)आंध्र प्रदेश, (Gujarat) गुजरात, (Kerala)केरळ, (Tamil Nadu)तामिळनाडू, (Odisha)ओडिशा, (West Bengal)पश्चिम बंगाल या राज्यांसह इतर चार केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. काही तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सून केवळ केरळमध्ये हजेरी लावणार असून तो देशभर सक्रीय न होण्याची भीती राहील. या पार्श्वभूमीवर कृषी, खाद्य, ग्रामीण विकास, जलशक्ती, वित्त या पाच मंत्रालयांच्या एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
चक्रीवादळामुळे यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडत आहे. आता महाराष्ट्रात पाऊस झाला, तर तो चक्रीवादळाचा परिणाम असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Meteorologist Ramchandra Sable)हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनीही यंदा पाऊस कमी होण्याची भीती व्यक्त केली.