(Yawatmal)यवतमाळ : (AAP)आम आदमी पार्टीच्या वतीने दारव्हा रोडवरील खड्ड्यांची पूजा करून पेढे वाटून खड्ड्यात झाड रोवुन लोहारा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दारव्हा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले तरी त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नाही. खड्ड्यांमुळे या मार्गावर दररोज अपघात होत आहेत. प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले.