(Nanded)नांदेड-गुरु गोविंद सिंह विमानतळ (Guru Gobind Singh Airport)पुन्हा एकदा सुरु करण्यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला. 10 जून रोजी नांदेड येथे (Union Home Minister Amit Shah)केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे.
या निमित्ताने विमानतळाची पाहणी करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून गुरु गोविंद सिंह विमानतळ बंद आहे. नांदेड येथील परभणी, हिंगोलीसह विदर्भ आणि आंध्रप्रदेश राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांना राजकिय अनास्थेमुळे बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांना विमानतळाची सुविधा मिळत नाही. मात्र आता पुन्हा एकदा या विमानतळावर नाईट लँडिंग करण्यासंदर्भात राज्यसरकारने पुढाकार घेतल्याचे (Minister Uday Samant) मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.