(Amaravati)अमरावती– अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील
जुना बैल बाजार परिसरातील अतिक्रमण हटवल्यामुळे अन्यायग्रस्त कुटुंब रस्त्यावर आले.
30 मे पासून उपोषणाला सुरुवात झाली आजचा नववा दिवस असूनही अद्याप पर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांनी त्यांना न्याय न दिल्याने आज (Former corporator of Chandubajar BJP)चांदुबाजार भाजपचे माजी नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन शाखेमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही या कार्यालयात हे आंदोलन सुरु ठेऊ अशी प्रतिक्रिया ठिय्या आंदोलनकर्त्यानी दिली.