(Nagpur)नागपूर-छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) कर्तृत्वामुळेच आपल्या अंगणातील तुळस आणि मंदिरावरील कळस टिकून राहिले. ते आत्मनिर्भर भारताचे जनक होते. महाराजांच्या आपल्यावरील उपकारांतून उतराई होणे आपल्याला शक्य नाही, असे प्रतिपादन संत तुकोबारायांचे वंशज ह.भ. प.(Shirish Maharaj More) शिरीष महाराज मोरे यांनी केले. नागपुरात श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकदिन म्हणजेच हिंदू साम्राज्यदिनानिमित्त आयोजित उत्सवात ह.भ.प. शिरीष महाराज मोरे बोलत होते. (self Sangh’s Mahanagar Sasanchalak Sridharrao Gadge)स्व. संघाचे महानगर सहसंघचालक श्रीधरराव गाडगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत ( Raje Dr. Mudhoji Bhosale) राजे डॉ. मुधोजी भोसले विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते.
ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले, प्रभू श्रीरामांचे चरित्र आणि श्रीकृष्णाची नीती यांचा मेळ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. देशाच्या इतिहासात मुस्लिम शासकांच्या अत्याचाराची अनेक उदाहरणे आहेत. मुस्लिम राजवटींचे अत्याचार आपल्यासमोर येऊच दिले गेले नाहीत अथवा आपणसुद्धा ते वाचून समजून घेण्याचे कष्ट घेत नाहीत. त्यांची माहिती घेतल्यास आपल्याला महाराजांच्या कर्तृत्वाची खरी कल्पना येऊ शकेल. त्यांच्या उपकारांची जाणीव होऊ शकेल, असेही ते म्हणाले. यावेळी ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी शिवचरित्राचा मागोवा घेताना श्रोत्यांपुढे अनेक प्रसंग जीवंत उभे केलेत.
याप्रसंगी बोलताना (Committee convener Dattaji Shirke)समितीचे संयोजक दत्ताजी शिर्के यांनी हिंदु साम्राज्य दिनाचे महत्व सांगितले. शिर्के म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या डोक्यावर हिंदुत्वाचे छत्र राहिले. शिवराज्याभिषेक दिन हा एक प्रकारे आपल्या हिंदूंसाठी स्वातंत्र्यदिनच आहे. आज साडेतीनशे वर्षांनंतरदेखील या घटनेचे महत्त्व कायम आहे. समितीच्या वतीने साडेतीनशेवे वर्ष दर महिन्याच्या पहिल्या रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वर्षभर साजरे केले जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळा सर्वप्रथम महाराष्ट्रात नागपुरात साजरा करण्याची सुरुवात झाली, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते समितीतर्फे आयोजित चित्रकला वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.