(Nagpur)नागपूर-सिमेंटची ऑनलाईन विक्री करण्याच्या नावावर चक्क फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. एका व्यक्तीची साडेतेरा लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला असून (Ambazari Police)अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात (Hingana)हिंगणा येथील (Praful Sonkusare) प्रफुल्ल सोनकुसरे (वय ३७) या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. सोनकुसरे यांच्या कंपनीला सिमेंटची गरज होती. त्यांनी सिमेंट ऑनलाईन मागविण्यासाठी ट्रेड इंडिया डॉटकॉम नामक संकेतस्थळावर नोंदणी केली. त्यानंतर (Saurabh Tripathi)सौरभ त्रिपाठी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने सोनकुसरे यांच्या कंपनीशी संपर्क साधला होता.
कंपनीला सिमेंटच्या ५ हजार पोत्यांसाठी अॅडव्हांस रकमेची मागणी करण्यात आली. त्यासाठी यस बँकेच्या अंधेरी शाखेतील खातेक्रमांकही देण्यात आला. या खात्यात वेळोवेळी साडेतेरा लाख रुपये जमा करण्यात आले पण सिमेंटचा पुरवठा झाला नाही. रक्कमही वापस करण्यात आली नाही. अखेर सोनकुसरे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आयपीसीच्या ४१९, ४२० व सहकलम ६६(सी) अन्वये आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.