क्रौर्याचा कळस गाठला..लिव्ह इन पार्टनरची हत्या..मृतदेहाच्या तुकड्यांची अशीही विल्हेवाट

0

(Mumbai)मुंबई– मुंबईत एका लिव्ह इन पार्टनरने क्रौर्याची परिसीमा गाठली. त्याने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. या व्यक्तीने तिचे केवळ तुकडेच केले नाही, तर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खाऊ घातल्याची काळजाचा थरकाप उडविणारी धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे. (Mumbai Live-in Partner murder ) या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे. मुंबईतील मीरा रोड भागातील गीता-आकाशदीप सोसायटीत ही घटना उघडकीस आली आहे.

आरोपीचे नाव (Manoj Sahani)मनोज साहनी असून तो ५६ वर्षाचा आहे. तो या सोसायटीत सातव्या माळ्यावर आपली 36 वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिच्यासोबत राहात होता. काही दिवसांपासून मनोजच्या फ्लॅटमधून विचित्र दुर्गंधी येत होती. या दुर्गंधीमुळे त्यांचे शेजारी पुरते हैराण झाले होते. याबाबत त्यांनी चौकशीही केली. पण काहीच लक्षात येत नव्हते. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. नया नगर पोलिसांनी मनोजच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली असता फ्लॅटमध्ये अत्यंत उग्र असा वास येत होता. घराची झडती घेतली असा त्यांना महिलेच्या मृतदेहाचे तुकडे दिसून आले. पोलिसांनी मनोजला तात्काळ अटक करून त्याची चौकशी सुरु केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने लिव्ह इन पार्टनर सरस्वतीच्या खुनाची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.