नागपुरात ईडीचे आर संदेश समूहावर छापे

0

नागपूरः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने नागपुरातील एका उद्योग समूहावर छापे घातले आहेत. आर. संदेश असे या ग्रुपचे नाव असून हा समूह रामदेव अग्रवाल व दिलीप अग्रवाल यांच्या मालकीचा आहे. आग्रवाल यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले आहेत. ग्रुपच्या जमिन खरेदी प्रकरणी हे छापे असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून (ED Raids on Nagpur Group) रामदासपेठ परिसरात हे छापे पडल्याची माहिती आहे. कारवाई सुरुच असल्याने यासंदर्भातील सविस्तर माहिती पुढे येऊ शकलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास पेठ परिसरातील कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या ठिकाणी शुक्रवारी सकाळीच ईडीचे पथक पोहचले आहे. या ठिकाणी आर. संदेश ग्रुपचे रामदेव आग्रवाल यांचे निवासस्थान आहे. अग्रवाल यांचे बांधकाम, कापड उद्योग, मिडिया आणि औषध क्षेत्रात काम आहे. नागपूरातील काही जमिन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा