जिल्हा सामान्य रुग्णालयात वीज पुरवठा खंडित, रुग्णांचे हाल

0

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या आठ ते दहा दिवसापासुन वारंवार वीज पुरवठा खंडीत होतं असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील काही विभागातील बत्ती गुल असल्यामुळे सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे मशीन. या संपूर्ण विभागामध्ये अंधार दिसून येत आहे आणि ब्लड बँक, ब्लड टेस्टिंग.या विभागातली बत्ती गुल झाल्याने ब्लड डोनर, ब्लड रिपोर्टच्या मशीन बंद आहे. गेल्या काही दिवसांपासुन काही वार्ड मधील एका बेडवर दोन दोन पेशंट उपचार घेताना दिसून येत आहेत.
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथील वारंवार विज खंडीत होण्याचे जनरेटर मधले MCB वेळोवेळी ट्रिप होत असल्यामुळे रुग्णालयात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे.