Home NAGPUR NEWS मराठी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन

मराठी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन

0

नागपूर विभागात उत्साहाचे वातावरण

नागपूर (Nagpur) मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ, नागपूर विभागाच्या वतीने आयोजित अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी मा. सुरेश भट नगरी, जवाहर विद्यार्थी गृह सभागृहात सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार आहे. या संमेलनाचे आयोजन मुंबई महानगर अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे.

संमेलनाचे आयोजन व तयारी

या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, विदर्भ प्रांतपाल डॉ. इंजि. प्रविण उपलेंचवा आणि जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर मुळीक यांनी विशेष मेहनत घेतली असून, त्यांची संपूर्ण टीम या उपक्रमात योगदान देत आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

  • सकाळी ८:०० ते ९:३० – वाजतगाजत ग्रंथ दिंडी, सभागृहाच्या परिसरातून काढण्यात येईल.
  • सकाळी १०:०० – उद्घाटन सोहळा

उद्घाटन: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष: जेष्ठ साहित्यिक डॉ. पुष्पा सुभाष तायडे या मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. रेखा जगनाडे-मोतेवार यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील.

मुख्य अतिथी:

  • मा. सुधाकर अडबाले (शिक्षक आमदार, महाराष्ट्र विधान परिषद)
  • मा. मोहन मते (आमदार, नागपूर विभाग)
  • मा. कृष्णा खोपडे (आमदार, पूर्व नागपूर विधानसभा)

विशेष अतिथी:

  • मा. मंगेश घवघवे (प्राचार्य, नंदनवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय)
  • जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट (मुंबई)
  • जेष्ठ साहित्यिक ना. ललिता गवांदे (नाशिक)
  • जेष्ठ कवयित्री ना. रेखा दीक्षित (कोल्हापूर)

सन्माननीय पाहुणे:

  • मा. डॉ. विनायकराव जाधव (पुणे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष)
  • मा. प्रियंका ठाकूर (हिंदी सिनेमा, टीव्ही आणि नाट्य अभिनेत्री)
  • श्री कुमार श्रेयस (चित्रपट निर्माते व दिग्दर्शक)
  • मा. रीतू चौहान (आध्यात्मिक व रेकी मार्गदर्शक)

परिसंवाद व कवी संमेलन सत्र

  • परिसंवाद: ‘वाचनसंस्कृती – वास्तव व अपेक्षा’ या विषयावर मा. बापूराव पाटील ठाकरे (जळगाव जिल्हा अध्यक्ष) यांचे मुख्य भाषण होणार असून, अध्यक्षपद मा. नीता कचवे (अमरावती जिल्हा अध्यक्ष) भूषवतील.
  • कवी संमेलन: संपूर्ण महाराष्ट्रातून प्रसिद्ध कवी सहभागी होणार असून, अध्यक्ष जेष्ठ कवयित्री मा. संगीता रामटेके (गडचिरोली जिल्हा अध्यक्ष) तर प्रमुख पाहुण्या जेष्ठ कवयित्री मा. छाया पाथरे (अमरावती) असणार आहेत.
  • परीक्षक म्हणून सौ. संजीवनी काळे (अमरावती)डॉ. ज्योती नागपूरकर असतील. राजेश थळकर (रायगड जिल्हा अध्यक्ष) हे काव्य स्पर्धा प्रमुख असतील.

संमेलनाचे आयोजन व संयोजन

संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. इंजि. प्रविण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल)रत्नाकर मुळीक (जिल्हा उपाध्यक्ष) असून, श्री सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर अध्यक्ष) यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांना सौ. नीता चिकारे (जिल्हा अध्यक्ष), ज्योती नागपूरकर (तालुका अध्यक्ष), राजू वाघ (विदर्भ संघटक), मनीष उपाध्ये (जिल्हा सचिव) यांचा सक्रिय सहभाग आहे.

संमेलनाचे मुख्य समन्वयक नीलेश घवघवे व सौ. पुनम घवघवे असून, संयोजन समिती सदस्य नरेंद्र मोहिते (जिल्हा कार्याध्यक्ष), डॉ. रमणीक लेंगुरे (जिल्हा उपाध्यक्ष), डॉ. हिरालाल मेश्राम, सागर कोरडे, प्रा. उषा राऊत हे आहेत.

संमेलन गीत: मनीष उपाध्ये यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, रसिका बावडेकर यांनी गायले आहे.

मराठी साहित्यप्रेमींसाठी विशेष संधी

मराठी साहित्याच्या श्रीवृद्धीसाठी आणि नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले हे संमेलन अभूतपूर्व अनुभव देणारे असेल. सर्वांनी या संमेलनात सहभागी होऊन भरभरून आनंद घ्यावा, असे आवाहन मराठी साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.