‘या’ मुख्यमंत्र्यांचा ईमेल हॅक

0

पणजी (Panji), 30 नोव्हेंबर: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister of Goa Dr. Pramod Sawant) यांचा वैयक्तिक ईमेल काही काळासाठी हॅक झाला होता. , मुख्यमंत्र्यांचा जीमेल आयडी यूट्यूब आणि इतर सोशल मीडियाशी लिंक आहे.

परंतु, आता तो यशस्वीपणे रिस्टोअर करण्यात आलाय. यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 19 नोव्हेंबरच्या रात्री मुख्यमंत्र्यांचा ई-मेल हॅक झाल्यामुळे जीमेल अकाउंटचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि 4 ते 5 तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक जीमेल आयडी रिस्टोअर करण्यात आला. हॅकरचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.