ओबीसी समाजात भीतीचे वातावरण -डॉ बबनराव तायवाडे

0

नागपूर  Nagpur -मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागणी नंतर गरीब  OBC ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. नवे वाटेकरी होतील तर ओबीसींना आरक्षणात न्याय मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे Babanrao Tayawade  यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.

तायवाडे म्हणाले,२२ दिवस वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केल्यावर सरकारने बैठक घेऊन आम्हाला आश्वासन दिले की, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही.ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. सरकारने आश्वासन दिले असले तरी जे आंदोलन सुरू आहे, आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, असं आंदोलक सांगतात. ५४ लाख नोंदी सापडल्या का? यावर सरकारने स्पष्टीकरण देऊन ओबीसीचे समाधान करावे.५४ लाख नोंदी सापडल्या म्हणून मराठा समाज आनंदी आहे. मात्र ओबीसी समाज दहशतीखाली आहे.६ दिवसांत किती ही लोक वापरले, तरी सर्वेक्षण पूर्ण होणार नाही. ज्या ५४ लाख नोंदी सापडल्या त्यांचे सर्वेक्षण करून कोणाकडे प्रमाणपत्र आहे, हे तपासले पाहिजे.

सरकारने १३ कागद पत्र ग्राह्य धरणार असल्याचे सांगितलं, त्यावर आक्षेप मागितले. त्याचा निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत राजपत्र काढता येणार नाही. यामुळेच सरकार आंदोलकांच्या दबावात येणार असेल, तर ४०० जातींचा ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही. आम्ही पण मुंबई कडे कूच करू असा इशाराही तायवाडे यांनी यावेळी दिला.