जगदीश चाफेकर यांच्‍या तैलचित्रांचे प्रदर्शन ‘आभास’ 15 व 16 मार्च रोजी

0

नागपूर (nagpur), 12 मार्च
पुण्‍याचे पोर्टेट आर्टीस्‍ट जगदीश चाफेकर (Jagdish Chafekar) यांनी देश-विदेशातील निरनिराळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीच्या चितारलेल्‍या तैलचित्रांचे प्रदर्शन ‘आभास’ येत्‍या 15 व 16 मार्च रोजी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, नागपूर येथे आयोजित करण्‍यात आले आहे.

बोस्टन, कॅलिफोर्निया, न्यू-जर्सी, कनेक्टीकट, डलास येथे जगदीश चाफेकर यांच्‍या तैलचित्रांचे प्रदर्शन भरवण्‍यात आले होते. याशिवाय, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, बंगलोर, बडोदा आदी ठिकाणी त्‍यांच्‍या प्रदर्शनाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता हे तैलचित्रांचे प्रदर्शन खास नागपूरकरांसाठी भरविण्‍यात येत आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन 15 मार्च रोजी सकाळी 11 वा. कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन नागपूरचे निवृत्त प्राध्यापक नंदकिशोर मानकर व ऑल इंडिया रिपोर्टरचे संचालक मंदार अशोक चितळे यांच्या हस्ते होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari), स्‍व. राम शेवाळकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे, वनराईचे डॉ. गिरीश गांधी, अभिनेते डॉ. गिरीश ओक या नागपूरच्‍या सुपूत्रांसह अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या तैलचित्रांचा या प्रदर्शनात समावेश राहणार आहे. जगदीश चाफेकर यांनी हे प्रदर्शन प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना अर्पण केले आहे. हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. रसिकानी प्रदर्शनाला अवश्‍य भेट द्यावी, असे आवाहन जगदीश चाफेकर यांनी केले आहे.