world women’s day : धरमपेठ पॉलिटेक्निकमध्‍ये चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाऱ्यांचा सत्‍कार

0

world women’s day :धरमपेठ शिक्षण संस्थेच्या धरमपेठ पॉलिटेक्निक मध्‍ये जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्‍यानिमित्‍त नागपूर शहर पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांची विशेष उपस्‍थ‍िती लाभली. या कार्यक्रमात धरमपेठ पॉलिटेक्निकचे अध्यक्ष डॉ. विलास देशपांडे, प्राचार्य मीता कळाशीकर यांच्या हस्ते संस्थेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वंदना पाटील, गीता देवगडे, छाया पाटील, अनिता खोब्रागडे, महानंदा गेडाम, लीना शेवारे, कुमुद माटे इत्यादी महिला कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी अनेक दाखले देऊन महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. तसेच महिलांनी आत्मनिर्भर होणे आणि स्वसुरक्षा करणे कसे आवश्यक आहे, यासंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. विलास देशपांडे यांनी पुरुषांनी स्त्रियांना योग्य तो सन्मान देऊन सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मीता कळाशीकर यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्‍त्व पटवून दिले. मंचावर सर्व विभागप्रमुख जयश्री चाटे, पायल खोत तसेच साधना मोटवानी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्नेहल खंडागळे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.