शेतकऱ्यांना मिळतेय दहशतवाद्यांसारखी वागणूक

0

रविकांत तुपकरांचा सरकारवर गंभीर आरोप

अकोला. शेतकरी आंदोलनादरम्यान अंगावर डिझेल ओतून घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती. पोलिसांसोबतच्या संघर्षानंतर त्यांना अटक करण्यात आली (arrested after a standoff with the police ) होती. कारागृहातून बाहेर येताच त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार नक्षलवादी- दहशतवाद्यांसारखी वागणूक (Farmers are treated like naxalites-terrorists ) देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. . आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अकोला कारागृहात ठेवण्यात आले होते. बुधवारी त्यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर गुरुवारी अकोला कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली.

तुपकर कारागृहातून बाहेर येताच कार्यकर्ते, शेतकरी व जाहत्यांनी रविकांत तुपकर यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुपकर म्हणाले की, सोयाबीन, कापसाचे भाव पडलेले आहेत. त्या पिकांना भाव देण्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीमार केला. नक्षलवादी-दहशतवाद्यांसारखी वागणूक पोलिसांनी दिली. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. असे जेलमध्ये टाकून घाबरणारे आम्ही कार्यकर्ते नाहीत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आता महाराष्ट्रभर ही लढाई सुरूच राहणार आहे. याप्रकारचे हजारो गुन्हे दाखल झाले तरी काही फरक पडणार नाही. शेतकरी आता एकजूट झाला आहे. सरकारला व पुढाऱ्यांना शेतकरी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असा एल्गार त्यांनी यानिमित्ताने केला.

आई-पत्नीकडून औक्षण
तुपकर यांची अकोला मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. यावेळी त्यांच्या आई आणि पत्नी यानी तुपकरांचे औक्षण केले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेवून जल्लोश करत अशोक वाटीकापर्यंत मिरवणुक काढली. बुलढाणा येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. तुपकर यांनी आंदोलनात येऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर ते भूमिगत होते. १० फेब्रुवारीला अचानक पोलिसांच्या वेशा येऊन आंदोलनकर्त्यांमध्ये सामील झाले. त्यांनी अंगावर तेल ओतून घेतले होते. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्यांना रोखले होते.

 

 

 

 

 

संत्र्याची खीर आणि स्वीट कॉर्न साटोळी EP No-85|Orange kheer recipe|Sweet Corn Recipe|shankhnaad news