गायकवाड पाटील महाविद्यालयात पहिला पदवी दिवस उत्साहात…

0

एकुण २०२ पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार
गुमगाव :-
तुळशीरामजी गायकवाड पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालया तर्फे पहिल्यांदाच पदवी दिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी एम’टेक, एम.बी,ए आणि एम.सी.ए* च्या पदव्युत्तर शिक्षण प्रोग्राम्समधील आमच्या पदवीधर विद्वानांच्या समर्पित प्रयत्नांचा आणि उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. संजय दुधे*, माननीय प्र-कुलगुरू, आरटीएम नागपूर विद्यापीठ या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. तर डॉ. राजू हिवसे*, माननीय कुलसचिव, आरटीएम नागपूर विद्यापीठ, नागपूर आणि श्री. अरविंद कुमार, TCS, नागपूर* हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

डॉ. संदीप गायकवाड पाटील, गायकवाड पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सचे माननीय खजिनदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा.आकाश गायकवाड पाटील, श्री. विनोद गायकवाड पाटील, माननीय G.B सदस्य आणि डॉ. गीता पडोळे, माननीय G.B सदस्य उपस्थित होते.

उल्लेखित P.G कार्यक्रमातील 18 विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कु. काजल राजू पटले (MCA), कु. पुनम उपरे (MCA), कु. अंकिता संजय ठाकरे (MBA) आणि कु. सोनल विनोद भोयर (M.Tech Structural Engineering) यांना 1ली गुणवत्ता मिळवण्यासाठी तुळशीरामजी गायकवाड पाटील मेमोरियल गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले व श्री. पलाश शेखर खंगार (MCA), कु. रुचा रवींद्र भगत (M.Tech Structural Engineering) यांना तुलसीरामजी गायकवाड पाटील मेमोरियल सिल्व्हर मेडल देऊन द्वितीय गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तर श्री. हेरंभ गोविंदराव जटाधर (MCA) यांना तुलसीरामजी गायकवाड पाटील स्मृती कांस्य पदक ने तृतीय गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम आयोजित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रुपच्या माननीय व्यवस्थापनाचे व वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे माननीय प्राचार्य व उपप्राचार्य व गायकवाड पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सच्या इतिहासात हा कार्यक्रम एक महत्त्वाचा ठरावा यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित प्रत्येक सदस्याच्या प्रयत्नांचे देखील आभार प्रा.राधारमण शाहा यांनी मानले.