प्रफुल पटेल यांच्या चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे

0

 

गोंदिया (Gondia)-खा प्रफुल पटेल लोकसभा लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे काय कुंडल्या आहेत ते माहीत नाही. परंतु प्रफुल पटेल यांच्या चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत. त्यांनी सुरुवात करावी, आमच्याकडे पण त्यांच्या कुंडल्या आहेत असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राष्ट्रवादी- भाजपात तिकिटावरून रस्सीखेच सूरु आहे.भंडारा- गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपा नंबर एकची पार्टी असती तर प्रफुल पटेल हे राज्यसभेवर कशाला निवडून गेले असते? असा सवाल पटोले यांनी केला. त्यांनी मैदानात यायला हवं होतं, तसे पाहिले तर ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. कारण त्यांना माहित आहे की, भंडारा- गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद उरलेली नाही. म्हणून ते राज्यसभेमध्ये निवडून गेलेत. निवडणुकीमध्ये भंडारा-गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस हीच खरी ताकद असल्याचे दिसून येईल. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढणार का, या प्रश्नाच्या उत्तरात पक्षाने आदेश दिला तर त्याचे पालन करण्यात येईल असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.