सर्वात आधी नितीन गडकरी यांचे नाव असेल

0

नागपूर (Nagpur)– उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्यांनी गडकरींना ऑफर देणे म्हणजे गल्लीतील नेत्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देणे असं आहे. गडकरी आमचे मोठे नेते आहेत, पहिल्या यादीत महाराष्ट्राचे नाव नव्हते, जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरी यांचे नाव असेल, या माध्यमातून उद्धव ठाकरे स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतायत पण त्याचं हसं होत आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.जेव्हा एखादा मुद्दा उच्च न्यायालयासमोर असतो तेव्हा न्यायालय अशा प्रकारचे निर्देश देत असते. आमच्या वेळी मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं तेव्हा भरती करताना आमच्या अटींच्या अधीन राहून करा, अशा सूचना केल्या होत्या ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. मी न्यायालयाचा निर्णय ऐकलेला नाही पण माझ्या अनुभवानुसार सांगतो.

जागावाटपासाठी थोडा वेळ थांबा, आम्ही अधिकृतपणे सांगू , सुप्रिया सुळे यांना इतकं विचारतो की मावळमध्ये गोळीबार झाला, गोवारी लोकांचा पोलिस लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला तेव्हा सरकार कोणाचं होतं. ? आज सुप्रियाताई विरोधी पक्षात आहे म्हणून ते टीका करतात त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.