
(Nagpur)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर तर्फे आज पक्ष कार्यालय गणेशपेठ येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
या निमित्ताने शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी सांगितले की महाराष्ट्र दिनासोबतच 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. सरकारी कार्यालये आणि शाळांमध्येही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरात पसरलेले सर्वच महाराष्ट्रीयन लोक मोठ्या उत्साहात, आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात.
यावेळी महिला अध्यक्षा सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर,राजेश माटे, सोहेल पटेल, पुंडलिक राऊत, जानबा मस्के, कपिल मेश्राम, राहुल कांबळे, जावेद हबीब, रमेश फुले, राजू मिश्रा, लक्ष्मीकांत पांडे, आल्हाद जगम, मुमताज बाजी,अनिता वर्मा, शोभा येवले, गजानन महाकाळकर, गोविंद सूत्रावे, रवींद्र वाठ, , संदीप डोरलीकर, किरण ताई,
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.