वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0

जळगाव (Jalgaon ) – वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जळगाव (Jalgaon ), 29 मार्च,अमळनेर शहरातून कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. तीन संशयितांना अटक केली. त्या तिघांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अमळनेर शहरात वेगवेगळ्या भागात जाऊन मारुती सुझुकी कंपनीचे ईको गाडीचे सायलेन्सर चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आदेश दिले होते.

दरम्यान ही चोरी संशयित मनीष उर्फ सनी महाजन आणि त्याचे साथीदार हे सायलेन्सर चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील कमलाकर बागुल प्रवीण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील यांनी अमळनेर येथे जाऊन संशयित आरोपी मनीष उर्फ सनी रविंद्र महाजन, शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील आणि निखिल संतोष चौधरी तिघे रा. अमळनेर यांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.