ग्रामपंचायत निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या

0

निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात : मतदानाची उत्कंठा शिगेला


नागपूर. राज्यभरातच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी (Battle of Gram Panchayat Elections ) सुरू आहे. मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारतोफा शुक्रवार सायंकाळी ५.३० वाजता थंडावल्या (propaganda guns went Stop)असून रणधुमाळी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे.नागपूर जिल्ह्यात 237 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक हॉट आहे . आता मतदानाची उत्कंठा शिगेला पोहोचली (excitement of voting reached its peak ) आहे. आता कुणालाही सभा घेता येणार नाही. फेरीही काढता येणार नाही. उमेदवारांनी वैयक्तिक स्वरूपातील मतदारांच्या भेटीवर भर दिला आहे. निवडणूक असलेल्या गावांमधील राजकीय वातावरण गेले काही दिवस चांगलेच तापले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधल्या दिवशी म्हणजेच १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात या ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांची घोषणा करण्यात आली असून संवेदनशील मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त पोलिस कुमकही तैनात ठेवली जाणार आहे.
ग्रामीण भागात गेले काही दिवस निवडणूक प्रचाराचा अगदी धुराळा उडाला. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाली असली तरी बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष मतदानही होणार आहे. या निवडणुकीतही महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यात संरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदानांनी मतदानाच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या अवलंबल्याचे दिसून आले. सर्वाधिक कस पत्नी उमेदवार असलेल्या नवरोबांचा लागला आहे. आरक्षणामुळे गणित बिघडलेल्या अनेकांनी पत्नी किंवा परिवारातील महिला सदस्याला सरपंचाच्या रिंगणात उतरवित हौस भागवून घेतली आहे. त्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरतही जोरदार सुरू आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेकजण मतदारांची मनधरणी करत आहेत. कुठे पती-पत्नी अर्ज भरल्यापासून मतदारांच्या भेटी घेत आहेत, तर कुठे मतदानाच्या तोंडावर पतीदेवासोबत पत्नीही घराबाहेर पडून मतांचा जोगवा मागत आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंचाच्या भोवताल केंद्रित असली तरीही सदस्यांनाही आपापल्या वॉर्डातून आपले वर्चस्व दाखवून द्यायचे असल्याने जवळपास आठशे महिला सदस्यपदाकरिता रिंगणात आहेत. त्यांच्याही पतीदेवांची सातत्याने धडपड सुरू आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासोबतच विरोधकांना रोखून धरण्यासाठी नवरोबांची चांगलीच कसोटी लागली असून, कोण बाजी मारतो, हे निकालाअंती स्पष्ट होईलच.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा