
नागपूर(Nagpur), दि. २५ मार्च: मनीष नगर येथील माँ तुळजा भवानी देवस्थान येथे चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विशेष मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नागरिकांना आरोग्य तपासणी व मोफत औषधांचे वितरण केले जाणार आहे.
या शिबिराला एकनाथ संभाजी शिंदे यांच्या नावाने मनोकामना अखंड प्रज्वलित करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मंत्रालयातील आरोग्य कक्षाचे अधिकारी मंगेश चिवटे यांचे सहकार्य लाभणार आहे. हे शिबिर सुपर केअर हॉस्पिटल यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सार्वजनिक अष्टमी निमित्त होम-हवन पूजा व कन्या भोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शनिवार, दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत नगर भोज व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भक्तांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान भक्त समितीमार्फत करण्यात आले असून, ट्रस्ट अध्यक्ष प्रवीण लता बालमुकुंद शर्मा, सचिव सचिन लता बालमुकुंद शर्मा, तसेच शंकर कुलकर्णी महाराज, संदीप पाठक महाराज, बिमलेश तिवारी, रविशंकर ठाकूर, अरविंद ठाकूर आणि इतर भक्त समिती सदस्य यांचे विशेष योगदान आहे.















