Home Artical Blog भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न

भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न

0

जयघोष, शंखनाद, भगव्या ध्वजांनी संपूर्ण मार्ग भक्तीभावाने न्हाऊन निघाला.

नागपूर(Nagpur), दि. 26 एप्रिल:
भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूर तर्फे आयोजित भव्य स्कूटर व कार (टू-व्हीलर व फोर-व्हीलर) रॅली आज शहरात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडली. सकाळी धंतोली येथील गोरक्षण मंदिरापासून प्रारंभ झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. जय परशुराम, जय भवानीचा
जयघोष, शंखनाद, भगव्या ध्वजांनी संपूर्ण मार्ग भक्तीभावाने न्हाऊन निघाला.

नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शिवानीताई दाणी वखरे तसेच प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून गोरक्षण मंदिर येथे रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी नगरसेवक श्री विनयजी दाणी, सौ. धनश्री देशपांडे, स्पेसवुडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक देशपांडे आदींची उपस्थिती लाभली.

रॅली धंतोली, लोकमत चौक, रामदास पेठ, अलंकार टॉकीज चौक, शुभमंगल कार्यालय, ट्रॅफिक पार्क, झेंडा चौक, लक्ष्मी भुवन, बटुकभाई ज्वेलर्स चौक, शंकर नगर चौक, अभ्यंकर नगर, श्रद्धानंद पेठ, माटे चौक, प्रताप नगर, राधे मंगलम हॉल, पडोळे चौक मार्गे दीनदयाल नगर येथील श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिर येथे पोचली.

रॅलीमध्ये आकर्षण ठरलेले माहूरगड देवी रथ आणि भगवान श्री परशुराम रथ यांनी वातावरण भक्तिमय केले. रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

समारोप कार्यक्रम श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिर, दीनदयाल नगर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याच्या अभ्यासक व लेखिका डॉ. सौ. शुभाताई साठे उपस्थित होत्या. श्री राजीवजी हडप, नगरसेवक श्री दिलीपजी दिवे, नगरसेवक ईश्वर ढेंगळे, सुनील दांडेकर, जय पाठक (संयोजक), पराग जोशी (अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूर), नितीन पटवर्धन, शिव मंदिराचे अध्यक्ष दिलीप कातरकर, सचिव राजीव पथे, मनोज देशपांडे (सहसंयोजक), नरेंद्र कुलकर्णी, श्रद्धा पाठक, आशुतोष गोटे, राजेंद्र टाकळकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभली.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक पराग जोशी यांनी केले. डॉ. शुभा साठे यांनी आपल्या मनोगतात विज्ञान युगात भगवान परशुरामांचे स्मरण का करावे याचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज देशपांडे (सहसंयोजक) यांनी केले.