
शिवसेनेचा (उबाठा) संताप ‘माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही’ – शिवसैनिकांचा कडक इशारा
नागपूर(Nagpur): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा काडीचाही संबंध नसताना, केवळ स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी महाराजांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या स्वघोषित ‘धीरेंद्र शास्त्री’ (बागेश्वर धाम) यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागपूर महानगरतर्फे आज तीव्र शब्दांत धिक्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा अपमान करणाऱ्या या प्रवृत्तीचा माज उतरवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, असा संतप्त इशारा यावेळी देण्यात आला.ज्वलंत निषेध आंदोलन पार पडले:या अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूर महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, शहर प्रमुख संदीप रियाल पटेल, हरिभाऊ बानाईत आणि महिला आघाडी सौ डॉ.मंजुषा बोधनकर, सौ.सुरेखाताई खोब्रागडे, युवा सेना यांच्या खंबीर नेतृत्वात महाल येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ येथे भव्य निषेध आंदोलन व निदर्शने करण्यात आली.शिवसेनेची आक्रमक भूमिका:शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठणकावून सांगितले की, “छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्याबद्दलची चुकीची विधाने महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही. धीरेंद्र शास्त्री समस्त शिवप्रेमींची आणि महाराष्ट्राची बिनशर्त माफी मागावी. जर माफी मागितली नाही, तर महाराष्ट्राच्या मातीत बागेश्वर धामचा एकही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही. जिथे कार्यक्रम होईल, तिथे शिवसैनिक स्टाईलने उत्तर दिले जाईल!”नारेबाजीने दणाणले नागपूर:आंदोलनादरम्यान खालील घोषणांनी नागपूर शहर दणाणून सोडले:”छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ढोंगी शास्त्रींचा धिक्कार असो!””कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… माफी मागा, माफी मागा!””शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे करायचे काय? खाली मुंडकं, वर पाय!””महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, शिवरायांच्या अपमानाला माफी नाही!”या आंदोलनात राजे जयसिंह भोसले,गुलाब भोयर, नितीन सोळंके,निखिल जाजुलवार, भूषण वंजार, मयुर पुदघटवार,राजू दळवी,बॉबी गजभिये,राहुल कोल्हे, हरीश पाटील, मंगला देवेन्द्र राणे,जीवन वर्मा, रामेशेर खान, श्रीमती कुंदा सु. जोगी, राकेश कावडकर,शुभम बांधेवर, रोहित गौर, हरिश्चंद्र शाहू, गोलू मौदेकर, शंकर थुल, सुखदेव ढोके,राजेश रुईकर, सौ. वसुंधरा शेगावकर, कुंदा जोगी,सचिन कोपसे,अनिल बोजडे, बबलू दरोडे,पितांबर घोलपे, सतीश पाठक, कमल पाठक, ज्ञानेश्वर मोहाडीकर,सुनील कुचेकर, विकास देशमुख, संजय घटे, प्रदीप तुपकर,कौशिक येनगे, आशिष भोनदेकर,धर्मेंद्र निमा, सुनिल यादव, सुमित, सुखदेव कपाते, राजेश रुईकर शुभम बांदेकर गोलू मोंदेकर रोहित गोर प्रदीप पौनीकर यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी, शिवसैनिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला.














