Home Artical Blog जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपुरात उद्या भव्य महा वृक्षारोपण अभियान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपुरात उद्या भव्य महा वृक्षारोपण अभियान

0

चंद्रपूर (Chandrapur):- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समिती, चंद्रपूर यांच्या वतीने राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ अंतर्गत आज सोनचाफा मंदिर, पठाणपुरा गेटजवळ भव्य महा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत. महाराज सुधाकर बगडे, फादर सुनील जॉर्ज कुमार, मौलाना फजरुल रहमान खान, भंते मंगल बुद्ध विपसी आणि ग्यानी लाहोर सिंग जी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
या उपक्रमात नागरिक, सामाजिक संस्था, युवक, महिला, विद्यार्थी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.