Home Breaking news बारामतीवर दु:ख कोसळले! महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा हरवले

बारामतीवर दु:ख कोसळले! महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा हरवले

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित दादा पवार ( Ajit Pawar ) यांचा बुधवारी सकाळी बारामती नजीक बोजुबावी परिसरात झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या समवेत विमानातील वैमानिक, सुरक्षारक्षक व अन्य पाच जणांचा देखील मृत्यू झाला असल्याची अधिकृत घोषणा डीजीसीएच्या वतीने करण्यात आली आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला निघाले होते. मात्र बारामती जवळ पोहोचल्यानंतर लँडिंग करण्यापूर्वीच विमानात काही तांत्रिक बिघाड झाला व हे विमान धावपट्टी ऐवजी बाजूच्या डोंगराळ परिसरात कोसळले. कोसळताच विमानाने पेट घेतला व त्याचे अक्षरशः तुकडे झालेत. ज्या परिसरात हे विमान कोसळले तेथील गवत, झाडे झुडपे देखील जळून खाक झालेत. त्यामुळे या अपघातात कोणीही बचावले असण्याची शक्यता सुरुवातीपासूनच नाकारली जात होती. मात्र सर्व जखमींना बारामतीच्या शासकीय रुग्णालयात देण्यात आल्यानंतर स्थानिक डॉक्टर्स व वैद्यकीय पथकाने उपचार सुरू केल्याचे सांगण्यात येते. मात्र रुग्णालयात देण्यापूर्वीच सहाही जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

दरम्यान डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या संस्थेच्या वतीने सदर विमान अपघातातील सहाही जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असल्याने यासंदर्भातील संशय दूर झाला आहे.

महाराष्ट्राच्या व एकूणच देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव असलेले शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध करून आहेत. सुमारे सहा वेळा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेत. अर्थ, सिंचन, नियोजन अशा विविध विभागांचा कारभारही त्यांनी यशस्वीरित्या चालवला. काही काळ ते लोकसभेचे सदस्य म्हणूनही कार्यरत राहिले होते. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक स्वारस्य घेत त्यांनी पुढील काळात येथील राजकारणात कार्य केले. शरद पवारा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचा एक दमदार नेता, सहकार क्षेत्रात आणि एकूणच प्रशासनिक कारभारात त्यांची पकड मजबूत अशी मानली जात होती. त्यामुळे वयाच्या केवळ साठीत त्यांचे जाणे अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे.


सामान्यपणे व्हीआयपी प्रवास करणार असलेल्या विमानातील सुरक्षा व तांत्रिक व्यवस्था वारंवार तपासली जाते. त्याबाबत खात्री केल्यानंतरच विमान उड्डाण भरते. असे असताना मुंबईपासून केवळ 200 ते 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारामती पर्यंत पोहोचतात या विमानात तांत्रिक बिघाड होणे ही बाब संशयास्पद ठरते आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात असाही प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.


दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी बारामती कडे धाव घेतली आहे.