Home Artical Blog गुढीपाडवा आणि श्रीराम नवमी उत्‍सव 19 ते 26 मार्च दरम्‍यान

गुढीपाडवा आणि श्रीराम नवमी उत्‍सव 19 ते 26 मार्च दरम्‍यान

0

श्रीराम सेवा मंडळाचे भव्‍य आयोजन

नागपूर(Nagpur), 16 मार्च:
हिंदू नववर्षाच्‍या निमित्‍ताने श्रीराम सेवा मंडळ, बजाजनगर तर्फे गुढीपाडवा तसेच भव्‍य श्रीराम नवमी उत्‍सवाचे 19 ते 26 मार्च 2026 दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले आहे. उत्‍सवाचे यंदाचे हे 22 वे वर्ष आहे.
उत्‍सवाचा शुभारंभ गुढीपाडव्‍याला म्‍हणजेच गुरुवार, 19 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता आमदार संदीप जोशी यांच्‍या हस्‍ते गुढी उभारून केला जाणार आहे. त्‍यानंतर सायंकाळी 7 वाजता आर्ट ऑफ लिव्हींग द्वारे सत्‍संग होणार आहे.
शुक्रवार, 20 मार्च रोजी सायं. 7 वाजता अमृत वक्‍ते विवेक घळसासी यांचे ‘राष्‍ट्रीय उद्घोष… श्रीराम’ विषयावर व्‍याख्‍यान व त्‍यानंतर सफाई मित्रांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. 21 तारखेला प्रसिद्ध निवेदक प्रकाश एदलाबादकर यांचे ‘कथा रामरथाची’ विषयावर, 22 तारखेला प्रसिद्ध लेख‍िका रश्‍मी पदवाड-मदनकर यांचे ‘कायांतर – एक देह, दुसरा जन्‍म, तिसरा पंथ : एक समालोचन’ विषयावर, 23 रोजी प्रफुल्‍ल माटेगावकर यांचे ‘अंदमान – एक तीर्थक्षेत्र’ या विषयावर तर 24 तारखेला प्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर ‘रामायणातील हृदयबंध’ विषयावर व्‍याख्‍यान होईल.
25 रोजी ‘सियावर राम’ हा सांगीतिक कार्यक्रम होणार असून यात प्रसन्‍न जोशी, यामिनी पायघन व यश खेर यांचा सहभाग राहील. आर्य पुराणकर, प्रमोद बावणे व हर्षद पायघन वाद्यसंगत करतील तर निवेदन प्रफुल्‍ल माटेगावकर यांचे राहील.तसेच ह्याच दिवशी कौसल्येचे डोहाळजेवण हे एक आकर्षण असेल.
26 तारखेला दुपारी 12 वाजता श्रीरामजन्‍म व प्रसाद वितरण होणार असून कीर्तनकार विनय मोडक यांच्‍या राम जन्‍म कीर्तनाचा भाविकांना लाभ घेता येईल. आरती व सामूहिक रामरक्षा पठण दररोजची 7 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमांना आणि श्रीरामाच्‍या आरतीला सर्वांनी उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन प्रफुल्ल माटेगांवकर, रेणुका मुदलीयार, आरती देशपांडे, अपर्णा अत्रे, अपूर्वा माटेगांवकर, प्रतिमा माटेगांवकर, सुमित पातूरकर, गौरी ओक, शुभांगी खेर, श्रुती खोंड, शीतल सावजी यांनी केले आहे.