आमदारांना फोन करणाऱ्या नीरजचा किती जणांना गंडा ?तपासात होणार उलगडा

0

 

नागपूर : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून शिंदे- भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. आता 20 ते 22 मे दरम्यान तो होणारच असा दावा करीत स्वत:ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

 

 

यांचा पीए म्हणवून घेणाऱ्या नीरजसिंह राठोडने संघ मुख्यालय आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील दोन आमदारांसह महाराष्ट्रातील चार आमदारांना फोन करून मंत्री करण्याची ऑफर दिली. पीएने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे दोन दिवसांच्या जेवणाचे बिल देण्यासाठी दडपण आणले.

 

नड्डा यांचा मूड कर्नाटक निकालाने ठीक नाही, दोन तीनदा त्यांनी आठवण काढली, लवकर पैसे अकौंटला टाका असे फर्मान सोडले. याविषयीची ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांचे पीए राजेश यांनी तहसील पोलिसात तक्रार केली. आमदार कुंभारे बाहेर असल्याने त्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधून फोनवर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.कुंभारे यांच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.नागपूर पोलिसांनी नीरजला मोबाईलसह गुजरातमधून अटक केली.त्याने आतापर्यंत किती आमदारांना फोन करून पैसे मागितले याची माहिती पोलिस घेत आहेत. तपासतच सर्व बाबींचा उलगडा होईल अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त मुम्माका सुदर्शन यांनी दिली.