Home NAGPUR NEWS समाधानकारक उत्तर, नाही मिळालं तर.. आंदोलन करण्याचा इशारा:

समाधानकारक उत्तर, नाही मिळालं तर.. आंदोलन करण्याचा इशारा:

0

नागपूर (Nagpur):- दीक्षाभुमी नागपूर चे मालकी हक्क ७/१२ वर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ यांचे नांवाने ७/१२ कसा? महसुल अधिकारी, नझुल भुमापन अधिकारी, कंपनी व स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी १.७.२०२४ ला दस्तऐवज पुराव्यासह खुलासा करावा अन्यथा त्यांचेवर आंबेडकरी समाजाने एफ.आय.आर. रजिस्टर्ड करण्याची मागणी विनोद खोब्रागडे, जबाबदार व जागृक नागरीक तथा कायदयाचे विद्यार्थी, संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी यांनी पत्रपरिषदेत मागणी केली.

.डॉ. पंजाबराव देशमूख कृषी विद्यापिठ अकोला या नांवाने ७/१२ वर नोंद आहे व मात्र पटटेदार म्हणून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर अशी नोंद आहे. परंतू दीक्षाभुमी (Deekshabhumi) या नावाची दोन्ही मालमत्ता पत्रकामध्ये नोंद नाही. अश्याप्रकारे महसुल अधिकारी व भूमापन अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसुर केलेला आहे. तर दुसरीकडे दीक्षाभुमी स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी सुध्दा मागील ७० वर्षापासून दीक्षाभुमी या नावाने ७/१२ वर नोंद करण्याकरिता व प्रापर्टी कार्ड वर नोंद करण्याकरिता कुठलाही पाठपुरावा केलेला नाही.

त्यामुळे ते सुध्दा तेवढेच दोषी आहेतवास्तविक तेथे दीक्षाभुमी समारंभ अनुयायांना पाय ठेवण्याची सुध्दा जागा शिल्लक राहत नाही एवढी अफाट गर्दी असते, पुस्तकांची दुकाने असतात, तसेच आंबेडकरी जनता व इतर जनता शिस्तप्रिय असून आजपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही, अश्यावेळी त्या ठिकाणी पार्कीग ची कुठलीही आवश्यकता नसतांना सुध्दा स्मारक समितीचे पदाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे पदाधिकारी, एन.एम.आर.डि.ए. महसुल अधिकारी व नझुल भुमापन अधिकारी हे सर्व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जबरदस्तीने उत्खनन करणाऱ्या कंपनीला सहकार्य करीत आहे.