– २,३६२ खातेधारकांना ११.०६ कोटीचे प्रोत्साहन
महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान केवळ १० मिनिटात बॅंकेकडे वळते करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ३६२ लाभार्थ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे. सोमवारी सायंकाळी बॅंकेच्या खात्यात ११ कोटी ६ लाख ७४ हजार २२१ रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. याची तातडीने दखल घेत श्री बावनकुळे यांनी प्रोत्साहनपर अनुदान मिळवून दिले आहे.
सोमवारी बॅंकेच्या महाल येथील मुख्य कार्यालयात श्री बावनकुळे यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन निधी याबाबतची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. बॅंकेच्या अधिकाऱ्यांना अडचणींचा पाढाच वाचला. अडचणी समजून घेत बावनकुळे यांनी सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रोत्साहन अनुदान जारी करण्याची विनंती केली.
यावर अतिरिक्त मुख्य सचिवांनी आजच अनुदान जारी केले जाणार असल्याचे सांगितले. काही वेळ बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलत असतानाच १० मिनिटांच्या आताच मध्यवर्ती बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान बॅंकेकडे वळते करण्यात आल्याची बातमी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.आर. नाईक यांनी श्री बावनकुळे यांनी दिली.
आतापर्यंत २५९४ खातेधारकांना लाभ
२०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज घेऊन कोणतेही दोन वर्षे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या योजनेचे नागपूर जिल्ह्यातून ७,३७३ शेतकरी पात्र ठरले जहोते. तर मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे २,६५० पात्र खातेधारक प्रोत्साहनपर राशीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी २३५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही दिवसांपूर्वी मिळाला होता. सोमवारी श्री बावनकुळे यांच्या प्रयत्नाने २,३६२ खातेधारकांच्या खात्यात प्रोत्साहनपर राशी मंगळवारी जमा केली जाणार आहे. उर्वरित ५३ खातेधारकांना देखील तातडीने प्रोत्साहन राशी मिळावी यासाठी बॅंककडून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती असल्याची माहिती नाईक यांनी दिली.
कर्जधारकांची समस्या सोडविणार
मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडे थकित असणाऱ्या कर्जाची माहिती देखील बावनकुळे यांनी घेतली. अशा शेतकऱ्यांच्या समस्या देखील सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची हमी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना व उपस्थित शेतकऱ्यांना श्री बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे आहे. मागील मविआ सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी त्याची अमलबजावणी करण्याचे व लाभ देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच केले आहे. अर्थसंकल्पातून फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला प्रत्येक शब्द ते पाळतील.
– चंद्रशेखर बावनकुळे