चेंबरची प्रतिष्ठा धुळीस, बोलावले बाउंसर, व्हीडिओ झाले व्हायरल
नागपूर. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (NVCC) च्या निवडणुकीदरम्यान शनिवारी चेंबरची अनेक वर्षांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. 78 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा चेंबरच्या आमसभेत हाणामारी, धक्काबुक्कीची घटना (Incidents of fighting and jostling in the general assembly ) घडल्याने हा काळा दिवस (black day) ठरला. एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली. व्यापारी एकमेकांना पाहून घेण्याची धमकीसुद्धा (traders threatened each other) देत होते. चेंबरला पहिल्यांदा बाउंसरच्या भरोश्यावर निवडणूक घेण्याची वेळ आली. घटनाक्रमाचा व्हीडिओ रात्री समाज माध्यमांवर व्हायर झाले. चेंबरच्या प्रत्येक सदस्यांकरिता ही घटना लाजीरवाणी ठरली. अग्रसेन भनवात वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उपस्थित राहण्यासाठी सकाळपासूनच मतदार पोहोचू लागले. परंतु कार्यक्रम स्थळाच्या आत आणि बाहेर बाउंसर दिसल्याने व्यापाऱ्यांमध्ये रोष वाढत गेला.
एवढेच नाही तर काही ‘गुंड’ प्रवृत्तीच्या लोकांनाही बोलावण्यात आले होते. याच कारणावरून काही व्यापारी ‘तू-तू, मैं-मैं’ वर उतरले. त्यांना शांत करण्यासाठी बाउंसरची मदत घेण्यात आली. त्यानंतर मात्र वातावरण शांत होण्याऐवजी अधिकच तापले आणि शाब्दिक बाद शिवीगाळ, धक्काबुक्की व हाणामारीपर्यंत गेला.
वर्तमान कार्यकारिणी आणि सेव्ह एनव्हीसीसी पॅनल आपापल्या रणनीतीनुसार सभेला पोहोचले. दोघांचीही रणनीती वेगवेगळी असल्याने संपूर्ण वातावरण बिघडले. बोगस मतदार यादीवरूनही आरोप प्रत्यारोप झाले. या घटनेवरून चेंबरची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. एक माजी अध्यक्ष एका गटाकडून तर दुसरा माजी अध्यक्ष दुसऱ्या गटाकडून बाजू मांडताना दिसत होते. सभेत कुणालाही बोलण्याची संधी दिली नाही आणि प्रचंड गदारोळात प्रस्ताव पास करण्यात आला.
दोन्ही पक्षांनी एकमेकांना या गदारोळासाठी कारणीभूत ठरविले आहे. निवडणुकीनंतर चेंबरचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल, रमेश मंत्री नीलेश सूचक, मयू पंचमतिया व सेव्ह एनव्हीसीसी पॅनलच्या उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप केला. चेंबरमध्ये संविधानाची पायमल्ली करीत निवडणूक घेण्यात आली. बाउन्सरच्या उपस्थितीत धक्काबुक्की, हाणामारी झाली. अनेक जुन्या सदस्यांचे नूतनीकरण न झाल्याने ते एजीएममध्ये सहभागी होऊ शकले नाही. यापूर्वी चेंबरच्या जमीन हस्तांतरणात भ्रष्टाचा करण्यात आला. या विरोधात आता कायदेशीर लढा देण्यात येईल, असा इशारा त्यांननी दिला. अध्यक्षपदी फेरनिवड झालेले अश्विन मेहाडिया यानी सर्व आरोप नाकारत एजीएम आणि निवडणूक नियमानुसार झाल्याचे सांगितले. आपणाला व कार्यकारिणीला सर्व व्यापाऱ्यांचे समर्थन प्राप्त असून व्यापाऱ्यांच्या हितासाठी पुढेही चांगले काम करण्याचा विश्वास त्यांनी दिला.