विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

0

 

(Buldhana)बुलढाणा– हिंदू स्मशानभूमीसाठी मुस्लिम परिवाराने दान दिलेली 1 एकर शेत जमीन दत्तपूर येथील जाधव यांनी बेकायदेशीर पद्धतीने खरेदी करून तलाठी कार्यालयामार्फत फेरफार नोंद घेण्यासाठी ना हरकत देणाऱ्या सरपंच व सचिवावर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. तसेच बुलढाणा तालुक्यातील पांग्री ग्रामपंचायतीने बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून शासकीय कार्यालयाचे दोन वेगवेगळे शिक्के बनवून त्याचा गैरवापर केला आहे, असा आरोप करत खोट्या सह्या करणाऱ्यांवर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी बुलढाणा येथे सामाजिक कार्यकर्ते भरत चव्हाण यांनी 28 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्याप प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी चव्हाण यांनी दिला आहे.