Datta Dalvi मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द, दळवींना सशर्त जामीन

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना उद्देशून शिवीगाळ करणारे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुलूंड न्यायालयाने दत्ता दळवी यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणाचा प्रकरणाचा तपास संपेपर्यंत त्यांच्यावर काही प्रतिबंध लागू राहणार आहेत. मुख्यमत्र्यांविरोधात कोणतेही अवमानकारक वक्तव्य करण्यास. कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्यास त्यांना मनाई आहे, त्यांना पोलिसांना सहकार्य करण बंधनकारक आहे तसेच कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणेही बंधनकारक आहे.
दत्ता दळवी हे वरिष्ठ नागरिक असून त्यांना काही आजार देखील आहेत. तसेच ते पळून जाण्याची भीती नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (CM Eknath Shinde) उद्देशून शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी दत्ता दळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केल्यावर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. गेल्या २ दिवसांपासून दत्ता दळवी कारागृहात होते.