राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे नागपुरात आगमन

0

नागपूर :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) सध्या चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान 1 आणि 2 डिसेंबर असे दोन दिवस त्या नागपूर भेटीवर असून त्यांचे एअर इंडियाच्या विमानाने ज दुपारी १२.२० वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर शनिवार २ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात. यावेळी Governor Ramesh Bais, Union Minister Nitin Gadkari, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Air Marshal Vivek Gark, Brigadier Rahul Dutt, Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari, Police Commissioner Amitesh Kumar, Collector Dr. Vipin Itankar, Superintendent of Police Harsh Poddar राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विवेक गर्क, ब्रिगेडिअर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदींनी त्यांचे स्वागत केले.