नागपूर– (NAGPUR )भारतीय जनता पक्षाने(BJP) या देशातल्या घराणेशाहीच्या(politics) राजकारणाला फुलस्टॉप दिला. घराणेशाहीकडून येणाऱ्या हुकूमशाहीला फुलस्टॉप दिला आहे. राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे, मात्र गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्रातल्या सरकारवर कुठलेही आरोप नाही असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (Vinod Tawde)विनोद तावडे यांनी केले. शिक्षक सहकारी बँक सभागृहात आयोजित भाजपच्या स्थापना दिन कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. भ्रष्टाचार विरहित सत्ता हे देता येते हे भाजपने सिद्ध केले आहे. तरीही विरोधकांचे सातत्याने भाजपला विरोध करणे सुरू असते आणि हे आपल्या घराणेशाच्या पक्षाच्या आधारे सुरू आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मनाशी प्रतिज्ञा करतो. भारत मातेला विश्व गौरवाच्या शिर्षस्थानी पोहोचण्यासाठी अपार कष्ट करून आणि जन्मसामान्यांच्या विकासासाठी काम करेल. माजी मुख्यमंत्री (EKNATH SHINDE)आरोप करताहेत हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी परंपरा आहे. आम्हीही सत्ताधारी पक्षावर प्रचंड टीका केली होती. मात्र सोबत नंतर जेवण केलं होतं. इतर राज्यापेक्षा आपल्या राज्यातील राजकारण वेगळं आहे . भाजपा हा सत्तेसाठी नाही सत्ताही समाज परिवर्तनासाठी साधन आहे. हे साध्य नाही आणि हे समाज परिवर्तन करण्याचं काम गतीने होण्यासाठी भाजप तत्परतेने काम करते यावर तावडे यांनी भर दिला.