अमरावती– (AMRAVATI)अमरावतीच्या छत्रीतलाव (Umbrella Lake)परिसरात दहा एकर जागेमध्ये देशातली भव्य अशी 111 फुटाची मूर्तीचे लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
हनुमान जयंती व खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमानाची जी मूर्ती बसवली जाणार त्याचे सँपल दिल्लीवरून नवनीत राणा व (RAVI RANA)रवी राणा यांच्या घरी पोहोचले आहे. या हनुमान मूर्तीसमोर राणा दाम्पत्याने(HANUMAN CHALISA) हनुमान चालीसा पठण केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री समोर हनुमान चालीसा पठनाच्या मुद्द्यावरून राणा दाम्पत्यांना 14 दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला. 14 दिवस पर्यंत तुरुंगातही हनुमान चालीसाचे पठण केल्यानंतर ,उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर 111 फुटाची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प राणा दाम्पत्यानी केला होता.