वाहनावर कारवाई करण्यासाठी ‘बॉडीकॅम’चा उपयोग

0

नागपूर :(NAGPUR) जिल्हयात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (ग्रामीण) या कार्यालयाने दोन बॉडी कॅम (शरीर कॅमेरा) खरेदी केले आहे. या बॉडीकॅमचा उपयोग वायुवेग पथक तसेच समृध्दी महामार्गावर कार्यरत असलेल्या तपासणी पथकात करण्यात येणार आहे.
वायुवेग पथकातील तसेच समृध्दी महामार्गावरील पथकातील अधिकारी हे तपासणीअंती आपल्या शरीरावर दर्शनी भागात बॉडीकॅम लावून वाहनांची तपासणी करण्याचे तसेच वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास रस्ता सुरक्षाबाबत व समृध्दी महामार्गावर वाहनांच्या स्थितीबाबत, नियमांबाबत समुपदेशन करण्याचे कामकाज करणार आहेत. कामकाज करीत असताना वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केले गेले असेल तर ते लगेच बॉडी कॅमेरामध्ये येईल व त्याचा उपयोग अशा वाहनांवर कारवाई करण्यासही सोईचे होईल व रस्त्यावर होणाऱ्या अपघातास आळा बसणे शक्य होईल.
अशाप्रकारचा हा उपक्रम पहिल्यांदाच राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) मार्फत राबविला जाणार आहे. वाहनधारक व चालक यांनी या उपक्रमाची नोंद घ्यावी, असे नागपूर(ग्रामीण)चे प्रादेशिक परिवहन अधिकारी(VIJAY CHAUVAN) विजय चव्हाण यांनी कळविले आहे.

 

 

श्रीखंड आणि चक्का सॅन्डविच |How To Make Shrikhand | Chakka Sandwich Recipe |EP- 107 |