गडचिरोली: स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेला विद्यार्थी गावी परतला असता नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या (Naxalites shot and killed the youth ) केली होती. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हे हत्याकांड घडविले गेले होते. संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणाऱ्या या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधार्थ जंग-जंग पछाडले होते. अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक (naxalite arrested ) करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. प्रकाश उर्फ देविदास उर्फ आडवे मुरे गावडे (२७) रा. मर्दहूर, ता. भामरागड (Mardhur in Bhamragarh taluka) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यासह आणखी दोन नक्षलवाद्यांचा या घटनेत सहभाग असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्यांचाही कसोशीने शोध घेतला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावातील रहिवासी साईनाथ नरोटे या विद्यार्थ्यी 9 मार्चला तो शेतात गेला असता हत्या करण्यात आली होती. फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी ‘टीसीओसी’ (‘टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन’) पाळतात. यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत मर्दहूर या गावचा सुशिक्षित युवक साईनाथ नरोटी याची हत्या केली होती. या घटनेत नक्षली प्रकाश ऊर्फ देविदास गावडे व अन्य दोघांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. विश्वसनीय माहितीच्या आधारे बुधवारी त्याला अटक करण्यात आली.
अनेक विध्वंसक प्रकरणात सहभाग
नक्षली प्रकाश गावडे हा मार्च २००० मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्याची उत्तर गडचिरोली-गोंदिया विभागातील प्लाटून दलममध्ये बदली करण्यात आली. २००७-०८ मध्ये तो सेक्शन डेप्युटी कमांडर झाला. २००९ नंतर त्याने प्लाटून सेक्शन ‘ए’ आणि देवरी दलमचा कमांडर म्हणून काम केले. त्याच्यावर खुनाचे १०, चकमक ८, दरोडा १, जाळपोळीचे २ व अन्य १ असे २२ गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी कळविले आहे.