नागपूर. राज्य सरकारचे कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर (The state government employees are on strike for the last three days ) आहेत. बेमुदत संपात सहभागी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला होता. मात्र, मेस्मा कायद्याची मुदत संपल्याने सरकारपुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. संपकऱ्यांवर वचक बसविण्यासाठी विधिमंडळात तडकाफडकी मेस्मा कायदा (MESMA Act ) नव्याने संमत करून घेण्यात आला. नागपुरच्या संपकऱ्यांना मेम्सा अंतर्गत नोटीस (Notice under MEMSA) बजावण्यास आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिप कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मुख्यालयासमोर एकत्र येत मेस्मा कायद्याच्या प्रतींची होळी (Holi of copies of MESMA Act) केली. कारवाईच्या इशाऱ्याला घाबरणर नाही. हा आमच्या आणि कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. यामुळे परिणामांची परवा न करता निकराचा लढा देणार असल्याचा निर्धार यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. संप दडपण्यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.
जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. त्यातच जिल्हा परिषद प्रशासनाने संपात सहभागी काही कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याची नोटीस बजावली आहे. आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी प्रशासनाने बजावलेल्या नोटीस आणि मेस्का कायद्याच्या प्रतींची जाहीर होळी करीत संताप व्यक्त केला. त्यासोबतच कारवाईच्या इशाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे दर्शवून दिले. पेन्शनच्या मुद्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी नियुक्त त्रिसदस्यीय समिती गठन करण्याबाबत काढण्यात आलेला अद्यादेशालाही कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
जिप पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. जिप कर्मचाऱ्यांनी मुख्यालयापुढे जोरदार निदर्शने करीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. मेस्मा कायद्याच्या प्रतींच्या होळी प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते.